संघर्ष क्रीडा मंडळ

श्रम – धैर्य – निष्ठा

४२वा वर्धापन दिन

संस्थेबद्दल

संघर्ष क्रीडा मंडळ ही कोकणातली एक आघाडीची कबड्डी क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. १८ जुलै १९८२ रोजी स्थापन झालेली ही संस्था सातत्याने कबड्डी क्षेत्रात नवनवीन गोष्टी करीत आली आहे. सुरुवातीपासून आपल्या शिस्तीसाठी हा संघ प्रसिद्ध आहे. श्रम, धैर्य, निष्ठा हे ध्येय समोर ठेवून डीबीजे महाविद्यालयामध्ये १९८१ साली कबड्डी खेळणारे युवक भाऊ काटदरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आणि त्यांनी ही संस्था स्थापन केली. सुरुवातीच्या काळात छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन नंतर जिल्ह्यामध्ये एक आघाडीचा संघ म्हणून नाव मिळवले. १९८२ साल पासून चिपळूण तालुका व रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या ७५% स्पर्धे मध्ये अंतिम विजेतेपद संघर्ष क्रीडा मंडळ असे.

अध्यक्ष

श्री. सचिन प्र. कदम

२०२१-२२ ते २०२६-२७

माजी अध्यक्ष

श्री. नयन म. साडविलकर

२०१५-१६ ते २०२०-२१

श्री. भाऊ द. काटदरे

२००३-०४ ते २०१४-१५

कै. ॲड. प्रकाश सोमण
कै. मनोहर शेठ
आमच्यासोबत संलग्न व्हा

मंडळाची वैशिष्ट्ये

संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण ही १९८२ मध्ये स्थापित एक समर्पित क्रीडा अकादमी आहे जी व्यक्तींना कबड्डी खेळासाठी प्रशिक्षित आणि प्रोत्साहित करते.

प्रशिक्षण
सराव
स्पर्धांमध्ये सहभाग
प्रोत्साहन

आमची संस्था खेळाडू बनण्यासाठी नवतरूणांना प्रोत्साहित करते

शिस्त आणि समर्पण

खेळाडू मध्ये अत्यंत आवश्यक असलेले गुण अंगी बाणवण्यासाठी आम्ही शिस्त बद्धतेचे पालन करतो. खेळाडूने यशस्वी व्हावे यासाठी त्याने खेळाला समर्पित होऊन अतूट परिश्रम करावे यासाठी आम्ही आग्रही असतो

उत्कृष्ट प्रशिक्षण

आमचे प्रशिक्षक त्यांना असलेल्या अनेक वर्षांच्या अनुभवासह विशेष तंत्र वापरुन उत्कृष्ट प्रशिक्षण देतात

टीमवर्क

संघासाठी खेळाडूचे महत्त्व आणि खेळाडूसाठी संघाचे महत्व पटवून देतो आणि त्याद्वारे उत्तम सांघिक कामगिरी व्हावी यासाठी प्रयत्नशील असतो

प्रशिक्षक : कै चंद्रकांत नार्वेकर

आमचे प्रशिक्षक

खेळाडू म्हणून कामगिरी: १९५४ ते १९६८
पंच म्हणून कामगिरी: १९८० ते १९९०
प्रशिक्षक म्हणून कामगिरी: १९८३ ते १९९९
निवड समितीवर नियुक्ती: १९९८

जन्मतारीख: १५ जुलै १९३७

कै चंद्रकांत नार्वेकर

विडिओ

स्पर्धेची झलक

संघर्ष क्रीडा मंडळ

सर्वोत्कृष्ट खेळाडू, यशस्वी प्रशिक्षक वर्ग

Scroll to Top