- रत्नागिरी जिल्ह्यातील एकेकाळचा मातब्बर संघ, संघर्ष क्रीडा मंडळ संस्थेचा संस्थापक.
सन १९८१ ते १९८७ सात वर्ष महाराष्ट्र राज्य अजिक्यपद स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व.
त्यातील सहा वर्ष कर्णधारपद भूषवले. - डी. बी. जे . महाविद्यालयात बि.कॉम पहिल्या वर्षी कबड्डी खेळायला सुरवात. शेवटच्या वर्षी
विभागीय स्पर्धा मध्ये विजेतेपद. - १८ जुलै १९८२ ला महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर सहकार्याबरोबर संघर्ष क्रीडा मंडळाची स्थापना.
- १९८१ ते १९८८ या आठ वर्षात संघर्ष क्रीडा मंडळातून खेळ. संस्थेने बहु सांख्य स्पर्धा मध्ये विजेतेप
मिळवले. संस्थेचे नाव शिस्तबध्द म्हणून प्रसिद्ध होते. १५ जुलै २०२२, २१वा कबड्डी दिवस सोहाळा,
जेष्ठ खेळाडू सन्मान. १९९० मध्ये कबड्डी मधून निवृत्त. - निसर्ग विषयक कार्य
- १९९२ साली सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण संस्थेची स्थापना केली व पर्यावरण, निसर्ग संवर्धन क्षेत्रात भरीव कार्य करत आहेत. विविध पक्षी, प्राणी यांचे संरक्षण व संवर्धन. शाळामध्ये निसर्ग शिक्षण, प्लास्टिक रीसायकलिंग इत्यादी विषयात राष्टीय, आंतरराष्टीय स्तरावर कार्य. त्यांनी केलले महाराष्ट्रा मधील सागरी कासव संरक्षण व कासव महोत्सव विशेष प्रसिध्द आहे.
- इतर माहिती
- सदस्य अंतर राष्ट्रीय (IUCN) खवले मांजर तज्ञ कमिटी.
- माजी सदस्य महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ एकूण १८ वर्ष.
- अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन, सन २००८
- इयत्ता सातवीच्या इंग्रजीच्या पुस्तकात खवले मांजरावर भाऊ काटदरे यांनी लिहिलेला धडा.
- इयत्ता नववीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सागरी कासवांवर भाऊ काटदरे यांनी लिहिलेला धडा.
- इयत्ता बाराविच्या ईतिहासाच्या पुस्तकात बदलता भारत मध्ये भाऊ काटदरे व सह्याद्री
निसर्ग मित्र यांची माहिती सामाविस्ट
- खालील प्रकाशित पुस्तकात भाऊ काटदरे यांचे कार्य प्रसिद्ध
- पोलादी माणसे- पोलाद उद्यमिता प्रतिष्ठान.
- निसर्गपूर्ण – उर्जा प्रकाशन
- खरेखुरे आयडॉल्स – युनिक फीचर्स
- व्रतस्थ- चतुरंग प्रतिष्ठान प्रकाशन
- महत्वाचे प्राप्त पुरस्कार
- कार्लझीस वन्यजीव पुरस्कार
- RBS स्यांचुरी एशिया पुरस्कार
- झी चौवीस तास अनन्या सन्मान
- वसुंधरा मित्र पुरस्कार
- एकाल जनसेवक पुरस्कार