मूळ गाव तळसर, तालुका – चिपळूण,DBJ collage चा माजी विद्यार्थी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९८९ यावर्षी पोलिस उपनिरीक्षक पदी निवड.
नासिक येथील प्रशिक्षणात अंतिम परीक्षेत विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण.
तत्परता, कर्तव्य दक्षता आणि निर्णयक्षमता या गुणविषेशा मुळे मुम्बई पोलिस दलातील गुन्हे शाखेत “खंडणी विरोधी पथक “या पथकात निवड, गुन्हे शाखेत कार्यरत असताना मुंबईतील संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा बीमोड केला. अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय तक्सरी करणाऱ्या कुविख्यात माफियाला अटक करून सीबीआय.च्या ताब्यात दिले. खंडणी साठी लहान मुले आणि व्यक्तींचे अपहरण करणाऱ्या, रॉबरी , डॅकॉइटी, मर्डर अशा गंभीर गुण्यातील शेकडो गुन्हेगारांना अटक.
सिरियल बॉम्ब ब्लास्ट,आणि २६/११ अश्या गुन्ह्यांचा तपासकार्यात सहभाग. गुन्हा अन्वेषण विभागात पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असताना अत्यंत अवघड, संवेदनशील आणि क्लिष्ट गुन्ह्यांचा यशस्वीपणे तपास केला आणि त्या कार्याचा गौरव म्हणून शेकडो पारितोषिके