कनक संघर्ष

संघर्ष क्रीडा मंडळ कबड्डी क्षेत्रात उत्तम कामगिरी करत होते. तत्कालीन अध्यक्ष ऍड. प्रकाश सोमण यांनी संघर्ष मधील काही सभासदांची नाट्य कलेतील आवड बघून एकदा कार्यकारी मंडळात याबाबत चर्चा करून संघर्ष क्रीडा मंडळाचा सांस्कृतिक विभाग म्हणून ‘कनक’ ची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात तात्या आवले, प्रशांत पटवर्धन, भाऊ कार्ले, संज्या कदम, मना शिंदे यांनी हे व इतर चाळीस कलाकार प्रत्यक्ष विविध स्पर्ध्न्मध्ये भा घेत होते. तसेच सर्व मिळून ४० जणांचा ग्रुप ह्या विविध स्प्रधांची जबाबदारी पार पाडत होते. चिपळूण मध्ये प्रथमच “कनक -संघर्ष”ने भव्य राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन सुरु केले, अभिनय, गायन व नृत्य अशा स्पर्धेमध्ये अवघ्या महाराष्ट्रातून दीड-दोनशे स्पर्धक सहभागी होऊ लागले. प्राथमिक फेरी व अंतिम फेरी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात हाऊस फुल्ल रसिकांच्या समोर दर्जेदार सादरीकरणे होऊ लागले. नटवर्य राहूल सोलापूरकर, आदेश बांदेकर, माधव वझे, महेश कोकाटे, कांता कानिटकर, यांसारखे दिग्गज परीक्षक स्पर्धेला लाभले.

ह्या स्पर्धा १९८५ पासून सलग पंधरा वर्षे गाजल्या. त्यातूनच मग संघर्ष चे कलाकार भाऊ कार्ले, प्रशांत पटवर्धन व चाळीस-पन्नास कलाकार परीक्षकांचे मार्गदर्शन घेऊन अनेक अभिनय, एकांकिका लेखन, दिग्दर्शन, सादरीकरण असे सिंधुदुर्ग ते मुंबई पर्यंत अनेक दर्जेदार स्पर्धेत भाग घेऊन शेकडो पारितोषिके मिळवू लागले. एका बाजूला संघर्ष चा कबड्डी संघ चौरंगी व जिल्हा, राज्यस्तरीय अनेक स्पर्धेत असंख्य बक्षिसे पटकवात असताना, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा ही घोड दौड चालू होती.

त्या वेळची संघर्ष ही राज्यातील कला व क्रीडा अशा दोन्ही क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त करत होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top