रक्तदान

संघर्ष क्रीडा मंडळाचे खेळाडू संख्या नेहमी पन्नासच्या आसपास असते. आम्ही सातत्याने नवनवीन प्रयोग करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील असतो. १९८०-९० च्या दशकात आम्ही वेळोवेळी पाहत होतो की अनेकांचे नातेवाईक किंवा अगदी आमच्या खेळाडूंपैकी कोणाचे तरी  नातेवाईक यांना काही वेळा ऑपरेशनच्या वेळी रक्त लागायचं आणि रक्त मिळवणे कठीण असायचे.  थेट रक्तपेढी मधून रक्त मिळत नसे कारण रक्तदाते कमी असल्यामुळे रक्ताचा साठा फार कमी असायचा. त्या काळात थेट रक्तदानाचे रक्त काढून रुग्णाला चढवता येत असे. त्यामुळे रक्तदाते शोधत राहायला लागायचं व ते खूप कठीण असायचं. लोक रक्त द्यायला पुढे येत नाही ही कायमची परिस्थिती आहे व तेव्हाही तशीच होती.

आम्ही असा विचार केला की मोठ्या प्रमाणात रक्तगट तपासणी करून प्रत्येकाची यादी बनवावी आणि वार्ड वाईज लोकांची रक्तगट नोंद यादी उपलब्ध करून द्यावी. यामुळे रक्तदानाची वेळ येईल तेव्हा ज्यांना कुणाला रक्त पाहिजे असेल त्यांनी आपापल्या भागातीलच लोक रक्तगट मिळाल्यामुळे रक्त मिळणं सोपं होईल हा त्यामागचा दृष्टिकोन होता. त्यावेळी आम्ही दोन-तीन मोठे रक्तगट तपासणी कार्यक्रम आयोजित केले आणि त्याच्या माध्यमातून यादी मोठी बनवली होती. ही यादी अनेक वर्ष आम्ही वापरत होतो. ज्या कोणाला रक्त पाहिजे त्यांना त्यातील नेमके कुठला रक्तगट पाहिजे तो पाहून आम्ही योग्य व्यक्तीचा संपर्क करून देत होतो.

आता कायदे बदलले, थेट रक्त काढून रुग्णाला रक्त चढवणे बंद झाले आणि रक्त पेढीतूनच रक्त घेणे बंधनकारक झाले. त्यानंतर आम्ही रक्तदान शिबिर चालू केली आणि त्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तपेढीमध्ये रक्त देणे चालू केले. यामुळे समाजाला जी रक्ताची गरज असते ती भागवता यावी या दृष्टीकोनातून आमचा सातत्याने प्रयत्न असतो.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top