जाखडी स्पर्धा

संस्थेचे खेळाडू सतत नाविन्याच्या शोधात असत. आम्हाला कुठली तरी  स्पर्धा घ्यायची होती. निराळे काहीतरी करायचे होते. ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा विषय धरून काही तरी करावे असे आम्हाला वाटत होते. खूप दिवस आम्ही चर्चा करत होतो आणि या चर्चेतून एक असा निष्कर्ष निघाला की जाखडी स्पर्धा ह्या कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गौरी गणपती मध्ये होत असतात. याची लोकप्रियता प्रचंड आहे त्याच्यामुळे याच्या स्पर्धा कुठे होत नाहीत तर त्या स्पर्धा आपण घेतल्या तर खूप चांगले होईल असं आम्हाला वाटलं. यातूनच या स्पर्धा घेण्याचा आम्ही निश्चय केला. त्या स्पर्धा घ्यायच्या म्हटल्यानंतर त्या जाखडी नृत्य कधी होतात? कसे होतात? कशासाठी होतात? कशाप्रकारे होतात? दोन संघा मध्ये सवाल जवाब इत्यादी बाबींचा अभ्यास करण्यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातिल त्या विषयातील लोकांजवळ बोललो.

जाखडीचे जिल्हा अध्यक्ष श्री भाई सुर्वे यांना आम्ही या स्पर्धांना बोलावलं. त्याचबरोबर विविध संदर्भ ग्रंथ वाचून त्याच्या माध्यमातून जाखडीची संपूर्ण सांस्कृतिक व ऐतिहासिक माहिती काढली आणि त्याला प्रसिद्धी दिली. स्पर्धेला चांगली प्रसिद्धी मिळाली आणि ग्रामीण भागातील कलाकारांना एक चांगले स्टेज मिळाले. सांस्कृतिक केंद्राच्या भव्य रंगमंचावर त्यांना जाखडी नृत्य करताना खूप आनंद झाला. या स्पर्धा आम्ही काही वर्ष सातत्याने घेत होतो. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top