खेळामध्ये पाय घट्ट रोवल्यानंतर हळूहळू त्यांनी त्यांनी पंच म्हणून कामगिरी करायला सुरुवात केली. अनेक खेळाडू जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील पंच परीक्षा पास होऊन पंच म्हणून उत्तम कामगिरी करू लागले. आपला खेळ अधिक उत्तम व्हावा यासाठी कै. चंद्रकांत नार्वेकर या रेल्वेच्या राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक यांना संस्थेसाठी प्रशिक्षक म्हणून आणले. त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रम मुळे संघात उत्तम उत्तम खेळाडू तयार झाले.
संघर्ष क्रीडा मंडळ कबड्डीमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर इतर काही गोष्टी कराव्यात असे वाटू लागले आणि त्यातूनच १५ ऑगस्ट रोजी जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले. चिपळूण मधील प्रसिद्ध रामतीर्थावर पावसाळ्याच्या दिवसात खूप मोठ्या प्रमाणात लोकं, युवक, मुलं पोहायला येत असत. अनेक जण याच ठिकाणी पोहायला शिकलेले आहेत. चिपळूण मध्ये पूर्वी जलतरण स्पर्धा होत नसत. संघर्षचे भाऊ काटदरे हे पोहोण्या मध्ये प्रसिद्ध होते. चर्चेतून निराळे काहीतरी करूया म्हणत सर्वांनी जलतरण स्पर्धा घेण्याचे ठरवले. रामतीर्थ येथे स्पर्धा घेण्याच्या दृष्टिकोनातून कुठली सोय नव्हती. रामेश्वर मंदिर अर्धे पडलेले होते म्हणून आम्ही त्या ठिकाणी शेड बांधून त्यामध्ये रात्रभर थांबून भुता खेताच्या गोष्टी गप्पा मारत रात्र जायचे आणि सकाळी स्पर्धा व्हायच्या. या स्पर्धेमध्ये चिपळूण मधील खेळाडूंना जलतरण क्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण झाली. पुढे या स्पर्धा १५ ऑगस्ट शासकीय कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट झाल्या होत्या.
पुढे चिपळूण नगरपरिषदेचा जलतरण तलाव चालवायला घेतल्यानंतर ही स्पर्धा उत्तम प्रकारे करण्यात आली. मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये खंड पडले परंतु सातत्याने ही स्पर्धा चालू ठेवण्याचा संघर्ष क्रीडा मंडळाचा प्रयत्न आहे. चार वर्षे जलतरण तलाव संघर्ष क्रीडा मंडळाने चालवला त्यावेळी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपले खेळाडू पदके मिळवायला लागले होते.
संघर्ष
आता परीक्षा आहे त्यामुळे खेळ नको असे उत्तर आले…
…अशा प्रकारच्या अन्यायाविरुध्द आपण संघर्ष करायचा असं मुन्ना म्हणाला. आम्ही प्राचार्यांकडे गेलो. चांगल्या अभ्यासाच्या हमीवर त्यांनी खेळायला परवानगी दिली. आम्ही उत्तम खेळून महाविद्यालयाला अजिंक्यपद मिळवून दिले. आता संघर्ष आमच्या मनामध्ये रुजले होते.
संघ
आम्ही विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत गेलो विजय मिळवत गेलो
पंच आणि प्रशिक्षक
फक्त खेळ एवढेच उद्दिष्ट न ठेवता पंच – प्रशिक्षक तयार करण्यासाठी प्रयत्न केले. कै. चंद्रकांत नार्वेकर या रेल्वेच्या राष्ट्रीय प्रशिक्षकांना आणून सातत्याने खेळाडूंना प्रशिक्षण दिले. त्यामुळेच आम्ही उत्तम कबड्डी खेळाडू तयार करू शकलो.